पर्यावरणाचा होणारा ऱ्हास बघताना मनाची होणारी तळमळ नुसतीच व्यक्त करून न थांबता त्यांचा बचावासाठी ठोस पावले उचलण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी एकत्र येऊन सागरी कासवाचे संरक्षण मोहिमेला सुरुवात केली.
सागरी कासव या महत्त्वपूर्ण निसर्गघटकाला असणाऱ्या धोक्यासंबंधीची महिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी व ठिकठिकाणच्या संस्था, व्यक्ती यांचा या कामामध्ये सक्रिय सहभाग लाभावा हा या पुस्तिकेमागील मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तिकेत सागरी कासवांची माहिती, त्यांना असणारे धोके व त्यावरील उपाययोजना तसेच कासवांच्या संरक्षण पद्धतीविषयी माहिती देण्यात आली आहे.